विझोरी जलशुद्धीकरण केंद्रातून शिवाजीनगर, पटेल कॉलनी व शांतीनगरला थेट पाणीपुरवठा सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 2, 2026

विझोरी जलशुद्धीकरण केंद्रातून शिवाजीनगर, पटेल कॉलनी व शांतीनगरला थेट पाणीपुरवठा सुरू

 विझोरी जलशुद्धीकरण केंद्रातून शिवाजीनगर, पटेल कॉलनी व शांतीनगरला थेट पाणीपुरवठा सुरू




अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज नगरपरिषदेचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळेवाडी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुप्रतीक्षित पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. विझोरी जलशुद्धीकरण केंद्रातून थेट शुद्ध पिण्याचे पाणी शिवाजीनगर, पटेल कॉलनी आणि शांतीनगर परिसरातील नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे माळेवाडीकरांच्या अनेक दशकांच्या शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
सन 1985 मध्ये माळेवाडी ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून येथील नागरिकांना कायमस्वरूपी शुद्ध पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा होती. गेल्या अनेक दशकांपासून नागरिकांना प्रामुख्याने बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा हा माळेवाडीकरांसाठी कायमच जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न राहिला होता.
माळेवाडी ग्रामपंचायतीचा अकलूज नगरपरिषदेत समावेश झाल्यानंतर नगरपरिषद निवडणुकीच्या काळात शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी माळेवाडीकरांना विझोरी जलशुद्धीकरण केंद्रातून थेट शुद्ध पिण्याचे पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा शब्द दिला होता. दिलेला हा शब्द आता केवळ आश्वासन न राहता प्रत्यक्षात उतरला आहे. शिवाजीनगर, पटेल कॉलनी आणि शांतीनगर परिसरात विझोरी जलशुद्धीकरण केंद्रातून थेट शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्याचा शुभारंभ नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे आणि उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवतेजसिंह मोहिते-पाटील म्हणाले की, माळेवाडीकरांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आम्हाला यश आले आहे. माळेवाडीतील उर्वरित भागांमध्येही सुरू असलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करून लवकरच त्या भागातील नागरिकांनाही विझोरी जलशुद्धीकरण केंद्राचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या परिसरासाठी 200 केव्ही क्षमतेचा डीपी बसविण्यात आला असून, 11 केव्हीची वीजवाहिनी शिफ्टिंग करण्यात आली आहे. तसेच माळेवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामेदेखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठा सुरू झाल्याने शिवाजीनगर, पटेल कॉलनी आणि शांतीनगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, अनेक वर्षांपासूनची शुद्ध पाण्याची मागणी पूर्ण झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील, क्रांतिसिंह माने-पाटील, सचिन देशमुख, नामदेव गलांडे, नासिक सोनवणे, अझर शेख, विलास क्षिरसागर, स्वाती फुले, मनीषा तिकोटे, मृदुला सूर्यवंशी, मिलिंद कोतमिरे, मोहसिन शेख, पृथ्विराज अंबुरे, विश्वास मोरे, उज्वला विटकर, वैशाली भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर फुले, सुनंदा फुले, माजी उपसरपंच अरुण खंडागळे, अरविंद राऊत, गोरख फुले यांच्यासह आजी-माजी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages