सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पूल कॅम्पस ड्राईव्ह’ला उत्स्फूर्त प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 2, 2026

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पूल कॅम्पस ड्राईव्ह’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

 सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पूल कॅम्पस ड्राईव्ह’ला उत्स्फूर्त प्रतिसाद





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव - सोलापूर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पूल कॅम्पस ड्राईव्हला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. 

भारतातील अग्रगण्य औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या भारत फोर्ज कंपनीच्या सहकार्याने हा कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये B.E./B.Tech. तसेच डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 2024, 2025 आणि 2026 बॅचमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांना प्रत्यक्ष उद्योगांच्या अपेक्षांशी जोडण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी भारत फोर्ज, पुणे येथील डेप्युटी मॅनेजर अँड एचआर जितेंद्र झोपे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कंपनीतील करिअरच्या संधी, उद्योग क्षेत्रातील बदलती गरज, तांत्रिक कौशल्यांचे महत्त्व आणि रोजगारासाठी आवश्यक असलेल्या गुणांविषयी मार्गदर्शन केले.
सिंहगड संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारातून आयोजित या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये विविध भागांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि मोठ्या प्रमाणावर झालेला सहभाग पाहता कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. नवले यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नामांकित उद्योगांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होत असून, त्यांचा आत्मविश्वास आणि व्यावसायिक कौशल्यांचा विकास होण्यास मदत होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. शशिकांत हिप्परगी व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीही या संधीचे स्वागत करत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages