घरफोडी करणारी टोळी अकलूज पोलिसांच्या जाळ्यात
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणाने, धडाकेबाज कामगिरी करत,घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत, 3 आरोपींना अटक केली व त्यांच्याकडून 10,92220 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.यामुळे अकलूज पोलिसांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०८/०८/२०२६ ते ०९/०८/२०२६ दरम्यान इनामदारवस्ती, नेवरे (ता.माळशिरस) येथील फिर्यादी जितेन्द्र जयंतराव इनामदार यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून, अज्ञात चोरांनी घरातील १० ५०,००० किंमतीचे सोन्याचे
दागिने चोरून नेले होते. याबाबत अकलूज पोलीस ठाणेस गु.र.नं. ५४३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४)) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये अकलूज पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, डम्प डेटा, सीडीआर ॲनालिसीस व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेतला असता. संशयित आरोपी सागर दिलखुश काळे वय 36 वर्षे, रा. जळोळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यास ताब्यात घेऊन, त्याचेकडे गुन्हा अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदार आरोपी आकाश उर्फ पप्पण्या संभाजी चव्हाण वय 35 वर्ष, व सुरज उर्फ दम्या रवी चव्हाण वय 24 वर्षे, दोघे सध्या रा. पडसतळ, सांगवी, ता. पंढरपूर, मूळ रा. बादलकोट ता. पंढरपूर यांचे मदतीने नेवरे, यशवंतनगर व स्वरूपनगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे व चोरी केलेले सोन्याचे दागिने करकंब ता. माळशिरस येथील सोनार 'श्रीराम गोल्ड व सिल्व्हर पॅलेस' चे मालक शिवराज दीपक गोडसे रा. करकंब, ता. पंढरपूर याला विकल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने सदर सोनाराकडून एकूण ९,८२,२२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील फरार आरोपी आकाश चव्हाण व सुरज चव्हाण हे त्यांचे राहते घरी असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे गेले असता आरोपीस पोलीसांची चाहूल लागताच पळून जात होते. त्यावेळी त्यांना पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेण्यात आलेले असून, त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक ११/०९/२०२६ रोजी गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक १५/०९/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई विशाल कदम हे करीत आहेत.
तसेच अकलूज पोलीस ठाणे गु.र.नं. ५७७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये अकलूज नवीन बस स्थानक येथे फिर्यादी हे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने, त्यांचे बॅगेतून पर्स काढून घेऊन, त्यामध्ये असलेले १) ९०,०००/- रूपये १६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, २) २०,०००/- रूपये ०३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व ३) ५,०००/- रूपये रोख रक्कम असा एकूण १,१५,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये अकलूज पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेतला. संशयित विधीसंघर्षग्रस्त बालकाने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्हा अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल एकूण १.१०,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे विधीसंघर्षग्रस्त बालकाचे वडीलांनी तपासाकामी हजर केल्याने ते हस्तगत करण्यात आलेले आहेत.
*चौकट*
*यांचे मार्गदर्शनाखाली झाली कारवाई*
अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, विजय कबाडे अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रेरणा कट्टे अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पंढरपूर विभाग, संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज उपविभाग अकलूज,नीरज उबाळे पोलीस निरीक्षक अकलूज
तर धडाकेबाज कामगिरी करणारे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद साठे, शिवकुमार मदभावी, राहुल रणनवरे, तुषार (बबलु ) गाडे, दत्तात्रय खरात, अनुराधा अडगळे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ माने,पंडित गवळे, तुकाराम माने-देशमुख, विजय तवटे, सायबर पोलीस ठाणे कडील अजित सुरवसे व स्वप्निल जाधव

No comments:
Post a Comment