माढ्यातील कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालयात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा येथील संकल्प फाऊंडेशन संचलित, नामांकित कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालयाच्या नूतन सुसज्ज व अद्ययावत इमारतीत प्रथमच गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त सोमवारी 14 सप्टेंबर 2026 रोजी मोठ्या भक्तिभावाने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
माढेश्वरी अर्बन बँकेचे चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रालयात प्रथमच गणपतीची प्राणप्रतिष्ठापना संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक लुणावत व विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नेत्रालयाच्या प्रांगणात बाप्पाच्या आगमनामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.यावेळी पुरोहित बापू कुंभेजकर यांनी विधिवत मंत्रोच्चार आणि पूजेच्या विधीनंतर गणपती बाप्पाची मूर्ती वेदीवर विराजमान करण्यात आली.पहिल्याच वर्षी नूतन वास्तूत सुरू झालेल्या या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमामुळे शहर व परिसरातील नागरिक, नेत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांनी गणपती बाप्पाकडे 'भरपूर पाऊस पडू दे अन् दुष्काळ हटून सर्वांना सुख समृद्धीचे दिवस येऊ दे' म्हणून गणपती बाप्पाकडे साकडे घातले.नेत्र रुग्णांची सेवा करणाऱ्या या आरोग्य मंदिरात बाप्पाचे आगमन झाल्यामुळे वातावरण अधिक प्रसन्न व मंगलमय झाले असून बाप्पाच्या कृपेने येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला निरोगी दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना केली.
यावेळी पुरोहित बापू कुंभेजकर,वरिष्ठ अधिकारी निलेश कुलकर्णी,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,समाधान भांगे,अक्षय कवटे,सुरेश कुबेर,प्रीती घळके,सुमन पाटोळे,छबुबाई पाटोळे, ज्योतीराम घळके,जयश्री शिंदे,वृंदावनी भांगे यांच्यासह ग्रामस्थ व भाविक भक्त उपस्थित होते.

No comments:
Post a Comment