नेताजी प्रशालेस मुख्याध्यापक संघाचा 'जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार' प्रदान* - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 14, 2026

नेताजी प्रशालेस मुख्याध्यापक संघाचा 'जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार' प्रदान*

 नेताजी प्रशालेस मुख्याध्यापक संघाचा 'जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार' प्रदान

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार' मुख्याध्यापक रविशंकर कुंभार व पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
इसबावी (पंढरपूर) येथील  संतराज पॅलेस मध्ये आयोजित कार्यक्रमात शिक्षक आमदार जयंत आसगावकर, लेखाधिकारी श्रीकांत देवडीकर,मुख्याध्यापक संघाचे जिल्हा नियंत्रक समिती अध्यक्ष सुभाषराव माने ,स्वेरीचे अध्यक्ष बब्रुवान रोंगे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकारी आदी मान्यवरांच्या हस्ते शाळेला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेतील मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका अश्विनी यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
१९९० साली कामगार वसाहतीतील मुलांसाठी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी या शाळेची स्थापना केली होती. 'कामगार मुलांची शाळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विद्यालयातून आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडले असून ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व सर्व शिक्षक वर्ग सातत्याने प्रयत्नशील आहेत.
कला, क्रीडा, संगीत ,बाह्य परीक्षा,आर.एस.पी., स्काऊट-गाईड, आरोग्य व रक्तदान शिबीर, शिष्यवृत्ती वाटप अशा विविध शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांचे आयोजन शाळेच्यावतीने करण्यात येते. सोलापूर शहरातून एकमेव नेताजी प्रशालेस हा पुरस्कार मिळाल्याने निलम नगर परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 *चौकट* 
 *शहरातील पुर्व भागातील पहिली डिजिटल शाळा* 
प्रशालेने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमात मिळविलेले वाखाणण्याजोगे यश तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी केलेल्या अविरत परिश्रम व सातत्यता ठेवून प्रशालेला नावारूपाला आणल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येत आहे असे जिल्हा अध्यक्ष  तानाजी माने यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages