आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतला तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांना अधिक गती देण्यात यावी. तसेच आवश्यक त्या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी प्रभावीपणे सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिल्या.
अक्कलकोट पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार कल्याणशेट्टी यांनी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा, आरोग्य केंद्रांमधील विविध समस्या, आवश्यक सोयी-सुविधा तसेच नागरिकांना अधिक चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. आरोग्य विभागाने नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना आमदार कल्याणशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीस तहसीलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहायक गटविकास अधिकारी अमोल मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक राठोड, पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाराम शिवमूर्ती, विकास बुळा, विजय तानवडे, पंचायत समिती सदस्य विमल गव्हाणे, विनोद मोरे, अप्पासाहेब किवडे, उत्तम वाघमारे, शिवराज म्हेत्रे, विस्तार अधिकारी महेश भोरे तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment