लोकसंवाद २०२६’ अंतर्गत जय जवान तरुण मंडळात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 26, 2026

लोकसंवाद २०२६’ अंतर्गत जय जवान तरुण मंडळात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती

लोकसंवाद २०२६’ अंतर्गत जय जवान तरुण मंडळात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती

वृक्षारोपण व संवर्धन, पाणी बचत आणि सौरऊर्जेच्या वापराबाबत गणेशभक्तांना मार्गदर्शन



सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-  सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील जय जवान तरुण गणेश मंडळात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाच्या विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली.


यावेळी जय जवान तरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष राहुल भारत दिल्लीवाले, उपाध्यक्ष अर्जुन दिल्लीवाले, सचिव आकाश दिल्लीवाले, तसेच रोहन मैलावाले, खजिनदार सागर कजागवाले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व गणेशभक्त उपस्थित होते.

यावेळी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, पाणी बचत आणि सौरऊर्जेला प्राधान्य देण्याबाबत गणेशभक्त व नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे नियमित संगोपन व संवर्धन करणे आवश्यक आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी बचतीच्या सवयी अंगीकारणे, तसेच उपलब्ध नैसर्गिक ऊर्जास्रोतांचा प्रभावी वापर करण्यासाठी सौरऊर्जेला प्राधान्य देणे याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. पर्यावरण संवर्धनात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातूनही पर्यावरणपूरक संदेश समाजापर्यंत पोहोचविता येतो, असे यावेळी सांगण्यात आले.

*'लोकसंवाद २०२६’चा उद्देश स्पष्ट-*
माहिती कार्यालयाचे सामान्य सहाय्यक संजय घोडके यांनी ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. शासनाच्या विविध योजना, उपक्रम व नागरिकोपयोगी माहिती सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून जनसंवाद साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या डिजिटल संकेतस्थळाच्या माध्यमातून सार्वजनिक तसेच घरगुती गणपती उत्सवाची माहिती अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मंडळांनी तसेच नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित माहिती, व्हिडिओ, रील्स, छायाचित्रे आणि कथा या माध्यमावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती कार्यालयाचे दिलीप कोकाटे यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माहिती कार्यालयाचे फोटोग्राफर भाऊसाहेब चोरमले तसेच कृषी विभागाचे राजेंद्र तारवाले यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages