लोकसंवाद २०२६’ अंतर्गत जय अंबिका दत्त तरुण मंडळात पाणी संवर्धनाबाबत जनजागृती* - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 26, 2026

लोकसंवाद २०२६’ अंतर्गत जय अंबिका दत्त तरुण मंडळात पाणी संवर्धनाबाबत जनजागृती*

 लोकसंवाद २०२६’ अंतर्गत जय अंबिका दत्त तरुण मंडळात पाणी संवर्धनाबाबत जनजागृती




सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-   सोलापूर शहरातील बेडर पूल परिसरातील जय अंबिका दत्त तरुण मंडळ येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद २०२६’ अभियानांतर्गत पाणी संवर्धन विषयावर जनजागृती करण्यात आली. यावेळी पाण्याचे महत्त्व, पाण्याचा काटकसरीने वापर, उपलब्ध पाणीसाठ्याचे संवर्धन आणि दैनंदिन जीवनात पाणी बचतीच्या सवयी अंगीकारण्याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.


माहिती कार्यालयाचे लिपिक दिलीप कोकाटे यांनी प्रास्ताविक करून ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वसाधारण सहाय्यक संजय घोडके यांनी केले. यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित नागरिकांना पाणी संवर्धनासाठी लोकसहभागाचे महत्त्व सांगण्यात आले. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात कोणत्याही राजकीय व्यक्ती, पक्ष किंवा राजकीय बाबींचा उल्लेख न करता केवळ नागरिकोपयोगी माहिती व जनजागृतीवर भर देण्यात आला.


जय अंबिका दत्त तरुण मंडळाचे अध्यक्ष लखन अर्जुनसिंग खतारवाले, उपाध्यक्ष रमेश रानुसिंग बाबावाले, मिरवणूक प्रमुख रूपसिंग रामचंद्र पंतूवाले, सचिव कुणाल किसनसिंग मौलावाले, तसेच संजय पुरणसिंग मैनावाले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाहनचालक भाऊसाहेब चोरमले, पंकज बर्दापूरकर तसेच कृषी विभागाचे कर्मचारी राजेंद्र तारवाले यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्वसाधारण सहाय्यक संजय घोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages