मित्र कामगार गणेश मंडळाचा सामाजिक उपक्रम; ३२ रक्तदात्यांचे रक्तदान
कळंब (कटूसत्य वृत्त):- कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मित्र कामगार गणेश मंडळाने यंदा गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात तब्बल ३२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदविला.
मित्र कामगार गणेश मंडळाचे यंदाचे ६० वे वर्ष असून, सहा दशकांची परंपरा जपत मंडळाने यावर्षी गणेशोत्सवात सामाजिक तसेच प्रबोधनात्मक उपक्रमांना विशेष महत्त्व दिले आहे. मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा’ या हलत्या देखाव्याने गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतले. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे शौर्य आणि स्वराज्यासाठी केलेला त्याग प्रभावीपणे मांडण्यात आल्याने हा देखावा पाहण्यासाठी कळंबकरांची मोठी गर्दी होत आहे.
दरम्यान, देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसह विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी मंडळाच्या वतीने आज सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
रक्तदान शिबिर, ऐतिहासिक शौर्यगाथेचा हलता देखावा आणि महाप्रसादाच्या माध्यमातून मित्र कामगार गणेश मंडळाने उत्सवाला सामाजिक व प्रबोधनात्मक स्वरूप देत आपली ६० वर्षांची परंपरा कायम राखली आहे.
या उपक्रमासाठी नागेश तापडिया, बळीराम सुरवसे, राहुल पवार, रोहित पवार, योगेश सुरवसे, रवी साळुंखे, महेश सुरवसे, रवी पवार, रितेश सुरवसे, नितीन चव्हाण, आकाश साळुंखे, अमोल पवार, दीपक पवार, अतिश पवार, दिलीप पवार, सुमित पवार, अभिषेक साळुंखे, परशुराम सुरवसे, नरसु सुरवसे, सौरभ साळुंखे, अर्जुन पवार, सूरज साळुंखे, सुजित पवार, दिनेश पवार, ऋतिक पवार, अमर पवार, यश सुरवसे, सरिश सुरवसे, गोविंद साळुंखे, लतेश साळुंखे, गोपाल साळुंखे, पिंटू पडवळकर, अक्षय पवार, राहुल पडवळकर, मुकेश पवार, आदित्य सुरवसे, बाल्या चव्हाण, आकाश चव्हाण, सूरज पवार, गणेश पवार, सचिन सुरवसे, सचिन चव्हाण, सनी पवार, गब्बर पवार, आदित्य पवार, विकास पवार, करण साळुंखे, बापू सुरवसे , सिद्धार्थ पवार, विशाल पवार, पीयूष संगवे, राजवर्धन तीर्थकर व धीरज वाघमारे यांनी परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment