नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना: लाभ घेण्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 26, 2026

नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना: लाभ घेण्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन

नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना:

लाभ घेण्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन




                 पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-  शहरी भागातील नागरिकांचे राहणीमान सुधारण्यासाठी, पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध शासकीय व स्थानिक पातळीवरील कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शहरातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यधिकारी महेश रोकडे  यांनी  केले आहे.

              गणेशोत्सवातील भक्तीमय वातावरणाला लोकहिताच्या संवादाची जोड देत शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत संभाजी नगर, पंढरपूर येथील छत्रपती संभाजी नगर, गणेश उत्सव तरुण मंडळात  विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

              यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी 'दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान ' अंतर्गत बेरोजगार तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण, 'प्रधानमंत्री आवास योजना - शहरी' अंतर्गत शहरातील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी थेट आर्थिक अनुदान, शहरातील गरीब व गरजू रुग्णांसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची सोय, सफाई कामगारांसाठी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना, निराधार, वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजना, 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.०' आणि 'नगरोत्थान महाभियान' अंतर्गत शहरात नवीन अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा वाहिनी, सांडपाणी व्यवस्थापन आणि वस्ती सुधार योजनांबाबत माहिती दिली.

            यावेळी  मोबाईल आणि इंटरनेट हे ज्ञान व माहिती मिळविण्याचे प्रभावी साधन असले, तरी त्याचा अतिवापर विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकतो. सोशल मीडियावर अनावश्यक वेळ न घालवता विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर प्रामुख्याने अभ्यास आणि आवश्यक माहिती मिळविण्यासाठी करावा. तसेच इंटरनेट वापरताना वैयक्तिक व गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्याची विशेष काळजी घ्यावी  असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय लेंडवे यांनी यावेळी  केले.

          कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक पंकज गाडेकर, माजी नगरसेवक अभिमन्यू साबळे, आनंता साबळे, पांडूरंग वरपे, गणेश परेदशी, रवी साबळे, अतुल जाधव, पैगंबर मणेरी, बापू देवकर, संदीप साबळे, ॲड.पुजारी, गणेश कोळी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. 

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages