समाजभूषण पुरस्कार मनोहर सपाटे यांना जाहीर
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- कोल्हापूर येथील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आविष्कार सोशल अॅण्ड एज्युकेशनल फाउंडेशनचा यंदाचा राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार’ मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण रविवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता सरस्वती चौक परिसरातील छत्रपती शिवाजी प्रशालेच्या राजर्षी शाहू सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्यास सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment