लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या बॉयलरचे अग्निप्रदीपन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 26, 2026

लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या बॉयलरचे अग्निप्रदीपन

 लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या बॉयलरचे अग्निप्रदीपन

साखरेची एमएसपी पाच हजार करा; शेतकऱ्यांना एक हजारांचे अनुदान द्या- बाळराजे पाटील



अनगर (कटूसत्य वृत्त):-   यंदाचा आगामी गळीत हंगाम अत्यंत अडचणीच्या व प्रतिकूल परिस्थितीत सुरू करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या ऊसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे टनेज व उतारा कमी येण्याची शक्यता आहे. त्यातच केमिकलच्या दरात दीडपटीने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने साखरेची एमएसपी पाच हजार रुपये करावी तसेच रिकव्हरी दोन टक्क्यांनी घटणार असल्याने शेतकऱ्यांना एक हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली.
लक्ष्मीनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या बॉयलर विभागात गुरुवारी बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम झाला. त्यानंतर उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. ‘आम्ही बोलतो तेच करतो, मोठे बोलत नाही. ऊसाला जेवढा जास्त दर देता येईल, तेवढा देण्याचा आमचा प्रयत्न राहील,’ अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
प्रारंभी ऊस उत्पादक शेतकरी नागराज पाटील व त्यांच्या पत्नी कल्पना पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा व अग्निपूजा करण्यात आली. पौरोहित्य बाजीराव जोशी यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते लोकनेते बाबुराव पाटील अनगरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार यशवंत माने होते. यावेळी यशवंत माने, देवानंद गुंड, नाना डोंगरे व अस्लम चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, अध्यक्ष विक्रांत पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, सभापती असलम चौधरी, नाना डोंगरे, संचालक प्रकाश चवरे, जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे, बालाजी नरुटे, धनाजी गावडे, सतीश काळे, सतीश भोसले, हनमंत पोटरे, जालिंदर लांडे, दीपक माळी, सुशील क्षीरसागर, रमेश माने, संजीव खिलारे, सचिन चव्हाण, राजकुमार पाटील, सहदेव कापसे, नवनाथ मसलकर, बाळासाहेब भोसले, ज्योती विरपे, हेमंत गरड आदींसह ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रकाश चवरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages