बीसीए व एमसीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत व परिचय कार्यक्रम संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 5, 2026

बीसीए व एमसीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत व परिचय कार्यक्रम संपन्न

बीसीए व एमसीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत व परिचय कार्यक्रम संपन्न



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्या विकास प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बीसीए व एमसीए प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवोदित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची ओळख करून देणे, शैक्षणिक व्यवस्था, विविध उपक्रम, सोयी सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध संधींची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठ मधील कॉम्पुटर सायन्स अँड अप्लिकेशन्स चे विभागप्रमुख डॉ. एस. डी. राऊत, व्हाईस चेअरमन मधुकर कटकधोंड, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व कॅम्पस संचालक डॉ. अरुण एन. गायकवाड, डॉ. पी. आर. देशमुख, प्रा. अविनाश पाटील, डॉ. एस. आर. आळंद, प्रा. संजय बुगडे, प्रा. प्रतिक्षा कटकधोंड आणि तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळेस नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा परिचय करून दिला. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रम, अभ्यासक्रम, नियम व शिस्त तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. व्हाईस चेअरमन मधुकर कटकधोंड सर यांनी विद्यार्थ्याचे मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. एस. डी. राऊत यांनी ‘डिजिटल लर्निंग आणि ई-कंटेंट’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचे महत्त्व, आधुनिक अध्यापन पद्धती आणि शिक्षण प्रक्रियेत डिजिटल संसाधनांचा प्रभावी वापर याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कौशल्य विकास, तंत्रज्ञानाचे ज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास तसेच विविध सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. एल. कटाप, तर आभार प्रदर्शन प्रा. के. एल. चव्हाण यांनी केले. तसेच प्रा. एम. के. मुजावर यांनी प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन डॉ. एस. आर. आळंद यांनी केले. समन्वयक प्रा. जे. डी. पाटील, प्रा. एम. व्ही. सोनकवडे व प्रा. आर. सी. शिंदे आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष अमोल (नाना) चव्हाण, संस्थापक चेअरमन डॉ. जी. के. देशमुख तसेच व्हाईस चेअरमन मधुकर कटकधोंड यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages