सत्कारातून मिळालेले बळच ठरते प्रेरणादायी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 3, 2026

सत्कारातून मिळालेले बळच ठरते प्रेरणादायी

 सत्कारातून मिळालेले बळच ठरते प्रेरणादायी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर; मराठा सेवा संघाच्या वर्धापनदिनानिमित्त गुणवंतांचा गौरव




सोलापूर (कटूसत्य वृत्त) : समाजाकडून मिळणारा सन्मान हा केवळ कौतुकाचा क्षण नसतो, तर पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारे बळ असते. नगरसेवकपदाची निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतर उपमहापौरपदाची जबाबदारी मिळाली. त्यावेळी मराठा समाजाच्या वतीने झालेला पहिला सत्कार आजही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे, अशी भावना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केली.


मराठा सेवा संघाच्या ३७व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील होते.


याप्रसंगी कार्यकारी अभियंता नवनाथ चव्हाण, दत्ता मुळे, सोमनाथ राऊत, प्रकाश ननवरे, महेश देवकर, देविदास घुले, हनुमंत पवार, राम माने, आर. पी. पाटील, विजय पोखरकर, लता ढेरे, अभिजली जाधव आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव पवार यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक यांनी केले, तर उज्वला साळुंखे यांनी आभार मानले.


यशातून नव्या पिढीला दिशा


समाजातील गुणवंतांचा गौरव करणे हीच समाजाच्या प्रगतीची खरी दिशा आहे. युवकांनी शिक्षण, प्रशासन, कायदा, संशोधन यांसह विविध क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध करून समाजाचे नाव उंचवावे, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केले.


यांचा झाला विशेष सत्कार


बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. संतोष पाटील, डॉक्टरेट मिळवल्याबद्दल प्रा. डॉ. जीवन यादव, तसेच पुरातत्त्वशास्त्र विषयात सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मनाली जाधव यांचा उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages