मराठा सेवा संघाच्या दक्षिण भारत सचिवपदी राम गायकवाड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 2, 2026

मराठा सेवा संघाच्या दक्षिण भारत सचिवपदी राम गायकवाड


मराठा सेवा संघाच्या दक्षिण भारत सचिवपदी राम गायकवाड

कर्नाटक व तेलंगणाच्या उपाध्यक्षपदी पोपट राम गायकवाड भोसले यांची निवड




तुळजापूर (कटूसत्य वृत्त) : मराठा सेवा संघाच्या दक्षिण भारतातील आठ राज्यांच्या सचिवपदी राम गायकवाड यांची, तर कर्नाटक व तेलंगणाच्या उपाध्यक्षपदी पोपट राम गायकवाड भोसले यांची निवड करण्यात आली आहे.


मंगळवारी तुळजापूर येथे झालेल्या मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते राम गायकवाड व पोपट राम गायकवाड भोसले यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


यावेळी राष्ट्रीय सचिव सुनील महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाटील, तानुबाई बिरजे पत्रकार कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील, संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


राम गायकवाड व पोपट राम गायकवाड भोसले यांच्या निवडीबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages