सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचा लढा पुढे नेणे हीच विजय जाधवांना खरी श्रद्धांजली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 26, 2026

सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचा लढा पुढे नेणे हीच विजय जाधवांना खरी श्रद्धांजली

  सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचा लढा पुढे नेणे हीच विजय जाधवांना खरी श्रद्धांजली




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले युवा समाजसेवक तथा सोलापूर विकास मंचचे सक्रिय सदस्य कै. विजय कुंदन जाधव यांच्या अपघाती निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. सोलापूरची सर्वच क्षेत्रांत होणारी अधोगती थांबवून शहराला प्रगतीपथावर नेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा निर्धार शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केला.
सोलापूर विकास मंचच्या वतीने रंगभवन चौकातील समाज कल्याण केंद्र हॉल येथे आयोजित शोकसभेत मान्यवर बोलत होते. या शोकसभेस शहर व जिल्ह्यातून सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, विधी आणि उद्योग क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कै. विजय जाधव यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली वाहिली.
अपघाताची चौकशी आणि रस्त्याला नामांतराची मागणी
शोकसभेत बोलताना उपस्थितांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. कै. विजय जाधव यांच्या जाण्याने सोलापूर विकास मंचची आणि संपूर्ण सोलापूरची मोठी बौद्धिक हानी झाली आहे. ज्या रस्त्यावर त्यांचा दुर्दैवी अपघात झाला, त्या ठिकाणी भविष्यातील अपघात रोखण्यासाठी तातडीने गतिरोधक बसवण्यात यावेत, तसेच सदर रस्त्यास 'दिवंगत विजयराव जाधव मार्ग' असे नाव देण्यात यावे, अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. यासोबतच या अपघाताची प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात यावी, असा सूरही उपस्थितांमधून उमटला.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
या शोकसभेस कै. विजय जाधव यांच्या मातोश्री, भगिनी, मामा, मामी यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.
तसेच मिलिंद भोसले, प्रकाश कांबळे, शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, भारत पाटील, जयश्री तासगावकर, गौरी आंबेकर, सुधा पाटील, शैलेंद्र क्षीरसागर, मनोज क्षीरसागर, सुहास भोसले, योगीन गुर्जर, केतन शहा, नरसिंग मेंगजी, गणेश पेनगोंडा, डॉ. दिलीप बोर्डे, सूर्यकांत पारेकर, लिंगराज गुडूर, डॉ. संदीप आडके, ॲड. राजन दीक्षित, राजेश खरात, रमेश तिवारी, विठ्ठल लहाने, बागवान डोलाज, विजय बाहेती, धनश्री केळकर, मधुसूदन गुंडेती, प्रशांत भोसले, अशोक धुळगाव, प्रसन्न नाजरे, अमोघसिद्ध कोरे, साहेबराव पाटील, मनोज गायकवाड, प्रदीप शिर्के, पंकज चिंदरकर, राजकुमार कोळी, सुमंग गोयल, डॉ. बाहुबली दोशी, प्रतीक्षा जोशी, संतोष माने, बाळासाहेब मोरे, जी. के. देशमुख, राजेंद्र बिराजदार, प्रीती गायकवाड, महेश चिंचोळे, नागेश राजगुरू, माऊली पवार, सचिन पवार, रमेश वायचळ, घनश्याम दायमा, अतुल देशपांडे, मनोज देवकर, संतोष कांबळे, नागेश अकालदेवटे, प्रकाश भुतडा, शेखर बंगाळे, अर्जुन रामगीर, हुसेन नदाफ, डॉ. राजेश पडळकर, आनंद गायकवाड, अभिजीत मनमोहन, गुरुकुल गड्डम, पीआय महेश कराळे, महेश कासट, यशपाल चितापुरे, उदय चाकोते, ॲड. खतीब यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages