विजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; ९६ रक्तदात्यांचा सहभाग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 28, 2026

विजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; ९६ रक्तदात्यांचा सहभाग

 विजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; ९६ रक्तदात्यांचा सहभाग



मोहोळ (कटूसत्य वृत्त):-   युवासेना विधानसभा प्रमुख विजय गायकवाड यांच्या ३० व्या वाढदिवसानिमित्त शिवदीपक प्रतिष्ठान व विजय गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने ममता टॉकीज, मोहोळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिक व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते दीपक गायकवाड, ॲड. श्रीरंग लाळे, शिवरत्न गायकवाड, अशोक भोसले व दिलीप टेकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उद्योजक सम्राट सवासे, गणेश बापू गायकवाड, महादेव गोडसे, चंदूआप्पा गोडसे, राजरत्न गायकवाड, पांडुरंग गायकवाड, सुनील गायकवाड, अमोल काळे, अविनाश क्षीरसागर व अमोल महामुनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात एकूण ९६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम न राबवता रक्तदानासारखा सामाजिक उपक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत विजय गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष महालनूर, गणेश पासले, रविराज मस्के, परमेश्वर वाघमोडे, संदीप गायकवाड, रोहित गायकवाड, प्रविण गायकवाड, कीर्तीरत्न क्षीरसागर, विजय बरकडे, दिगंबर होनमाने, जयंत मांडवे, समाधान घोरपडे, सूरज गायकवाड, अक्षय भोसले, बिरू घोडके, गजानन खरात, वैभव गायकवाड व बिरू होनमाने यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages