ऊस उत्पादक शेतक-यांना शासनाने अनुदान द्यावे : जयसिंह मोहिते पाटील.
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सरकारने जे शेतकरी सहकारी साखर कारखान्यांना ऊस देतील त्या शेतकऱ्यांना एक हजार रुपये प्रति टन अनुदान द्यावे अशी मागणी सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी केली.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ मार्गदर्शक संचालक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी चेअरमन जयसिंह मोहिते पाटील बोलत होते.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,विश्वतेजसिंह मोहिते पाटील,उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख,आजी व माजी संचालक कार्यकारी संचालक सुहास यादव अधिकारी कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्ताविकात कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी सहकार महर्षी साखर कारखान्याने ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून या हंगामात उद्दिष्ट पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले.
सहकार महर्षी सोलापूर जिल्ह्यात उसाचा दर देण्यास कमी पडणार नसल्याची ग्वाही देत जयसिंह मोहिते पाटील पुढे म्हणाले की,जिल्ह्यात कारखान्यांची संख्या वाढली असून खाजगी कारखान्यांन बरोबर सहकारी कारखान्यांबरोबर स्पर्धा करावी लागत असून कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीने कारखाना अत्याधुनिक करणार असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना ११ टक्के दिवाळी बोनस जाहीर केला. यावेळी माजी उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

No comments:
Post a Comment