आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत डीवायपीसीओइ, आकुर्डी आणि पीसीसीसीएस, चिंचवड विजयी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 28, 2026

आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत डीवायपीसीओइ, आकुर्डी आणि पीसीसीसीएस, चिंचवड विजयी

 आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत डीवायपीसीओइ, आकुर्डी आणि पीसीसीसीएस, चिंचवड विजयी

जिल्हा विभागीय आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे पीसीसीओई मध्ये यशस्वी आयोजन





पिंपरी, पुणे (कटूसत्य वृत्त):-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये अंतिम स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, आकुर्डी संघाने पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी संघाचा ३ विरुद्ध १ या गुण फरकाने विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर मुलींच्या गटामध्ये अंतिम स्पर्धेत प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर सायन्स, चिंचवड संघाने पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी संघाचा २ विरुद्ध ० गुण फरकाने विजय मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.
     या स्पर्धेचे पीसीसीओई येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. अक्षय काशीद व डॉ. गणेश चव्हाण, एसपीपीयुचे अधिसभा सदस्य डॉ. रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.
    मुलांच्या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील ३५ संघांनी आणि मुलींच्या स्पर्धेत २९ संघांनी सहभाग घेतला होता. पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, डीन एसडीडब्ल्यू डॉ. पद्माकर देशमुख, स्पर्धेचे समन्वयक पीसीसीओईचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. 
    स्पर्धेच्या मुले व मुली स्पर्धेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या संघांना स्पर्धा आयोजक पीसीसीओई महाविद्यालयाच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्व विजेत्या संघांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
   तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यांमध्ये मुलांच्या गटात पीसीसीओई, निगडी संघाने एसएई, कोंढवा संघाला व डीवायपीसीओइ, आकुर्डी संघाने पीसीसीओईआर रावेत संघाला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच मुलींच्या गटात पीसीसीओई, निगडी संघाने पीसीसीओईआर, रावेत व पीसीसीसीएस, चिंचवड संघाने एएलसी, कान्हे संघाला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला.
   स्पर्धेचा अंतिम निकाल मुले विभाग प्रथम :- डीवायपीसीओइ, आकुर्डी; द्वितीय :- पीसीसीओई, निगडी आणि तृतीय क्रमांक : पीसीसीओईआर, रावेत या संघाने मिळवला. मुलीच्या विभागात प्रथम क्रमांक पीसीसीसीएस, चिंचवड; द्वितीय क्रमांक :- पीसीसीओई, निगडी आणि तृतीय क्रमांक :- एएलसी, कान्हे या संघाने मिळवला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages