विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या पिंपळनेर व करकंब युनिटचे
जेष्ठ कामगारांचे शुभहस्ते गव्हाण व मोळी पुजन संपन्न-
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि., या कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करंकब या कारखान्याचे ऊस गाळप हंगाम 2026-27 चा गव्हाण व मोळी पुजन समारंभ दोन्ही युनिटकडील जेष्ठ कर्मचा-यांचे शुभहस्ते व संचालक तथा मा.सभापती विक्रमसिंह शिंदे यांचे उपस्थितीत दि.24/09/2026 रोजी कारखाना कार्यस्थळावर पार पडला.
युनिट नं.1 कडील गव्हाण व मोळी पुजन समारंभ जेष्ठ कर्मचारी शिवाजी पाटील, रामचंद्र अडसुळ,.लक्ष्मण घोडके,.सुदन मोरे, कैलास डोके यांच्या शुभहस्ते सकाळी 10 वाजता व युनिट नं.2 कडील गव्हाण व मोळी पुजन सतिश गोडसे, नारायण भारती,सतिश मिसाळ,ईश्वर बागुल व दादासाहेब पवार यांचे शुभहस्ते दुपारी 1 वाजता संपन्न झाले. तसेच सदर दिवशी सकाळी श्री सत्यनारायण पुजा संचालक पंडीतराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नंदाताई पाटील व संचालक अशोक मिस्कीन व सौ.भाग्यश्रीताई मिस्कीन यांच्या शुभहस्ते कारखाना कार्यस्थळवार संपन्न झाली.
सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक तथा मा.सभापती विक्रमसिंह शिंदे,सौ.अमृताताई शिंदे, पोपट गायकवाड-व्हाईस चेअरमन, संचालक रमेश येवलेपाटील,पोपट चव्हाण, अशोक मिस्कीन,राजेश खोत,विलास कौलगे, सचिन देशमुख, संजय लोकरे,जितेंद्र गायकवाड,लाला मोरे,पंडीतराव पाटील,कैलास तोडकरी,राजाराम नाळे, राजाराम थोरात,श्रीकांत पाटील, पांडूरंग घाडगे, कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, युनिट नं.2 चे जनरल मॅनेजर पोपट येलपले तसेच सभासद,ऊस पुरवठादार,कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment