श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथील शमीवृक्षाखाली गेल्या ३३ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 23, 2026

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथील शमीवृक्षाखाली गेल्या ३३ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना

 श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथील शमीवृक्षाखाली गेल्या ३३ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना



अक्कलकोट :(कटूसत्य वृत्त)  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात सोमवारी सायंकाळी ७ वा. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक- अमोल पन्हाळकर यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली.


*या प्रसंगी न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते सहा.पोलीस निरीक्षक- अमोल पन्हाळकर यांचा सत्कार करण्यात आला. न्यासाचे सचिव शामराव मोरे काका,  पो.हे.कॉ.धोंडीबा ठेंगळे  हे उपस्थित होते.*

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथील शमीवृक्षाखाली गेल्या ३३ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमीविघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.

यावेळी मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, बाबुशा महिंद्रकर, प्रा.शरणप्पा अचलेर, रोहित खोबरे,सौरभ मोरे, शुभम सावंत, वैभव मोरे, विशाल कलबुर्गी,आकाश गडकरी, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, अनिल गवळी, अप्पा हंचाटे, सतीश महिंद्रकर, धानप्पा उमदी,रमेश हेगडे, तानाजी पाटील, राजू पवार, प्रसाद हुल्ले,धनंजय निंबाळकर, विलासराव रेड्डी, शेकप्पा मिनगले, भिमशा शिंदे, लक्ष्मण हिळळी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

चौकट : 
मंगळवारी दि.२२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वा. अक्कलकोट   दक्षिण पोलिस  ठाण्याचे पोलीस निरीक्षक- विनोद घुगे यांच्या हस्ते श्रींची पूजा आयोजित करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages