ईच्छा भगवंताची‎ गणेशोत्सव‎ तरुण‎ मंडळाची‎ प्रतिष्ठापना‎ मिरवणूक जल्लोषात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 16, 2026

ईच्छा भगवंताची‎ गणेशोत्सव‎ तरुण‎ मंडळाची‎ प्रतिष्ठापना‎ मिरवणूक जल्लोषात

 ईच्छा भगवंताची‎ गणेशोत्सव‎ तरुण‎ मंडळाची‎ प्रतिष्ठापना‎ मिरवणूक जल्लोषात




सोलापूर‎ (कटूसत्य वृत्त):-  ईच्छा भगवंताची नवरात्र‎ उत्सव संचलित,‎ संस्थापक-मार्गदर्शक व‎ आधारस्तंभ‎ लक्ष्मण मामा जाधव‎ यांच्या‎ नेतृत्वाखाली ईच्छा‎ भगवंताची गणेशोत्सव‎ तरुण मंडळाच्या लाडक्या श्री‎ गणरायाच्या‎ प्रतिष्ठापना‎ मिरवणुकीचा मोठ्या‎ जल्लोषात आणि‎ भक्तिमय वातावरणात‎ समारोप झाला.‎ प्रारंभी‎ ॲड.‎ अनिल दादा‎ जाधव‎ यांच्या‎ हस्ते‎ श्रींचे विधिवत‎ पूजन करून‎ मिरवणुकीस प्रारंभ‎ झाला.‎ सोलापूर‎ शहर मध्य‎ विधानसभा‎ मतदारसंघाचे दमदार‎ युवा‎ आमदार देवेंद्र‎ दादा कोठे‎ यांनी‎ मिरवणुकीत सहभाग घेत गणरायाचे पूजन‎ करून‎ मनोभावे दर्शन‎ घेतले. त्यानंतर‎ गणेशभक्तांच्या उत्साहात त्यांनी‎ डीजेच्या‎ तालावर‎ ठेका धरत उत्साह वाढविला.‎ मिरवणूक‎ गंगामाई हॉस्पिटल, लहान‎ इरण्णा वस्ती, शासकीय‎ गोदाम,‎ रामवाडी‎ हॉस्पिटल,‎ पटवर्धन‎ चाळ, गायकवाड क्लासेस, काका बीअर शॉप,‎ मरगू‎ मास्तर‎ मैदान, सेटलमेंट‎ ग्राउंड, ऐक्य चौक, विठ्ठल‎ मंदिर,‎ भोपळे‎ चौक मार्गे‎ ईच्छा भगवंताची‎ चौक‎ येथे‎ पोहोचली.‎ मंडळाने‎ नैसर्गिक फुलांचा वापर‎ करून‎ केलेली आकर्षक त्र्यंबक‎ सजावट‎ मिरवणुकीचे‎ विशेष‎ आकर्षण‎ ठरली. या सजावटीने‎ उपस्थितांचे‎ लक्ष‎ वेधून‎ घेतले‎ यावेळी‎ आमदार‎ कोठे म्हणाले, गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि‎ सामाजिक‎ एकतेचा उत्सव आहे.‎ मंडळाचे‎ शिस्तबद्ध आयोजन‎ कौतुकास्पद‎ असून‎ गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात‎ सुख, शांती‎ व‎ समृद्धी नांदो,‎ अशा‎ शुभेच्छा‎ त्यांनी दिल्या. मंडळाचे संस्थापक-मार्गदर्शक अध्यक्ष‎ लक्ष्मण मामा जाधव, नागेश अण्णा‎ गायकवाड, ॲड. अनिल दादा जाधव,‎ किसन‎ भाऊ‎ जाधव तसेच‎ उत्सव‎ अध्यक्ष उत्कर्ष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक‎ पार पडली. यावेळी‎ चेतन नागेश अण्णा‎ गायकवाड,‎ प्रेम‎ नागेश अण्णा‎ गायकवाड,‎ अजिंक्य‎ जाधव,‎ कार्तिक जाधव,‎ करण‎ जाधव,‎ प्रथमेश‎ गायकवाड,‎ तन्मेश गायकवाड, सोनू पटेल,‎ आकाश‎ जाधव, दिनेश‎ आवटी आदी उपस्थित होते.‎ रात्री प्रभाग २२ चे‎ भाजपा‎ नगरसेवक‎ किसन भाऊ जाधव व पवार मावशी यांच्या हस्ते‎ श्री‎ गणरायाचे पूजन‎ व महाआरती झाल्यानंतर भक्तिमय वातावरणात‎ प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages