अमित शाह यांच्या महाराष्ट्र बहुभाषिक राज्य वक्त्याव्यावरून मराठी एकीकरण समितीचा संताप
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ”महाराष्ट्र सारखे दुसरे बहुभाषिक रास्य संपूर्ण भारतात नाही” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागलेले आहेत.
मनसे नंतर आता मराठी एकीकरण समितीने देखील अमित शहा यावं यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.
नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये हिंदी दिवस आणि हिंदी राजभाषा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी या संमेलनात अमित शहा उपस्थित होते. शाह यांनी महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य असल्याचे वक्तव्य केला होतं. या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समितीकडून संताप व्यक्त होत आहे.
शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मराठी राज्यावर हळूहळू हिंदीचा शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप गोवर्धन देशमुख यांनी केला. उत्तर भारतातील अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने स्थानिक भाषांचे अस्तित्व कमी झाले, त्याच धर्तीवर इतर राज्यांमधील मूळ भाषांचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून करण्याचा डाव असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात हिंदीला सहभाषेचा दर्जा देण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप करून, आसाम राज्याप्रमाणे हिंदीला मराठी राज्यात सहभाषा करुन घ्यायची आहे का, राज्यातील नागरिकांनी हा प्रकार वेळीच ओळखणे गरजेचे आहे, असे देशमुख यांनी सांगितले. अमित शाह यांनी महाराष्ट्राबाबत इतके मोठे वक्तव्य करूनही राज्यातील राजकीय पक्ष आणि नागरिक मूग गिळून गप्प का आहेत, असा सवालही देशमुख यांनी उपस्थित केला.
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. फडणवीस यांनी `माझी आई मराठी मात्र, इतर भाषा मावशीसारख्या` असा उल्लेख या संमेलनात केला होता. १५० वर्षे जुनी हिंदी हजारो वर्षे इतिहास अभिजात ओळख असलेल्या मराठीची बहीण कशी? एकभाषिक मराठी राज्याचे प्रमुख असणारे फडणवीस यांनी भाषेचे नाते जोडण्यापेक्षा राज्यातील शेतकरी गोर गरीब कामगार आणि विध्यार्थी यांचे प्रश्न मार्गी लावावेत. राज्यात राज्यभाषेचे ६६ वर्षांनंतर ही एकही भवन नाही याची चिंता वाटायला हवी, असे देशमुख म्हणाले.

No comments:
Post a Comment