मंगळ मोहीम ते भविष्यातील रोबोट्स: ऑर्किड शाळेतील बालवैज्ञानिकांची अंतराळात उत्तुंग झेप! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 10, 2026

मंगळ मोहीम ते भविष्यातील रोबोट्स: ऑर्किड शाळेतील बालवैज्ञानिकांची अंतराळात उत्तुंग झेप!

 मंगळ मोहीम ते भविष्यातील रोबोट्स: ऑर्किड शाळेतील बालवैज्ञानिकांची अंतराळात उत्तुंग झेप!




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. लक्ष्मण करळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उत्साहात पार पडले. यावेळी तुकाराम चंद्रकांत साळुंखे, क्रांतिवीर शिवराम महिंद्रकर, डॉ.अशोक सोरगावी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी,स्कुलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी,स्कुलच्या मार्गदर्शिका मिना पारखे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी एआय च्या मदतीने आपल्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी अशा प्रदर्शनात सहभाग नोंदविला पाहिजे असे म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. .कुमार दादा करजगी व संस्थेच्या सचिवा सौ.वर्षाताई विभुते यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन कल्पनेचे कौतुक केले.
या प्रदर्शनात शाळेतील तब्बल ४९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या बालवैज्ञानिकांनी अंतराळ मोहिमा, मंगळ ग्रह व चंद्र मोहीम, भविष्यातील रोबोटिक्स तंत्रज्ञान आणि स्वयंचलित उपकरणांचे एकापेक्षा एक सरस जिवंत मॉडेल्स सादर केले. विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेने आणि आत्मविश्वासाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थीनी कु..सान्वी चव्हाण व संज्ञा मोहिते यांनी केले.
प्रदर्शनाप्रसंगी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना “विज्ञान केवळ पुस्तकात नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे”  याची अनुभूती मिळाली अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित पालकवर्गानी दिली. 
 प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या रोबोट्सच्या सादरीकरणाने या प्रदर्शनाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages