सम्मेद शहा यांची आंतरराष्ट्रीय जैन संघटनेत प्रसिद्धी प्रमुखपदी निवड
आज पर्यंत जैन समाजासाठी दिलेले योगदान, विविध धार्मिक व सामाजिक केलेली कार्ये याची दखल घेत ही निवड करण्यात आल्याचे संदेश गांधी यांनी सांगितले. लवकरच महाराष्ट्रासह इतर राज्यातील नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारोह इंदोर येथे संपन्न होणार आहे. ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संघटनेत निवड होऊन काम करण्याची संधी मिळाल्याने त्याचे सोने करेन असे सम्मेद शहा यांनी सांगितले.
या निवडीबद्दल भारत वर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक मिहीर गांधी यांच्यासह सोलापूर, अकलूज, नातेपुते, करमाळा, बारामती येथील विविध जैन संघटनेचे पदाधिकारी,पापरी पंच क्रोशीतून शहा यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment