श्री संतसेना नाभिक दुकानदार संघाची शनिवारी सर्वसाधारण सभा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 7, 2026

श्री संतसेना नाभिक दुकानदार संघाची शनिवारी सर्वसाधारण सभा

 श्री संतसेना नाभिक दुकानदार संघाची शनिवारी सर्वसाधारण सभा

महागाईच्या पार्श्वभूमीवर नाभिकांच्या दरवाढीवर होणार निर्णय




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वाढती महागाई, सलूनसाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाढलेल्या किमती, दुकानांचे भाडे, वीजबिल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर  नाभिक व्यवसायाच्या दरवाढीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी श्री संतसेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्था, सोलापूर यांच्या वतीने शनिवारी दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सात रस्ता येथील ईरण्णा उपलप मंगल कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अभयकुमार कांती यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         या सभेत मागील सभेच्या हिशोबाला मंजुरी, नाभिक व्यवसायाच्या दरवाढीबाबत चर्चा व निर्णय, संघटनेत सर्व पोटजातींचा समावेश, नवीन पदाधिकाऱ्यांची निवड तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळचे विषय यावर चर्चा होणार आहे.सभेला शहरातील नाभिक समाजाचे प्रमुख मार्गदर्शक मनोहर क्षिरसागर, प्रा. हिंदूराव गोरे, पंडित येळगे, संजय जोगीपेठकर, चंद्रमौळी तमणुर, ईश्वर घोडके, विठ्ठल सिंगराल, अनिल कोंडूर, विठ्ठल मालतुमकर, शेखर कोंडापूरे, राजू हळदे आणि शिवराज हडपद उपस्थित राहणार आहेत.
        या पत्रकार परिषदेस संस्थेचे आनंद सिंगराल, सिद्राम रुद्रार, भारत क्षिरसागर, राकेश सिंदगीकर, आनंद राऊत, मोहन जमदाडे, अनिल कोंडूर, गीतेंद्र बेनाळकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages