वामनराव शिंदे साहेब विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 4, 2026

वामनराव शिंदे साहेब विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

 वामनराव शिंदे साहेब विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. 



सांगोला (कटूसत्य वृत्त):-  आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै.वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती साजरी करण्यात आली. 
सुरुवातीस  प्रशालेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक  विठ्ठलपंत शिंदे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थी तुषार दौलतडे, ऋतुजा उबाळे  यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मनोगते व्यक्त केले. शिवांजली शिंदे मॅडम यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळक यांचे कार्याविषयी माहिती देऊन थोर महापुरुषांबद्दल विचार व्यक्त केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेत विविध स्पर्धा घेण्यात आले, यामध्ये लेखन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुंभार सर यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी थोर महापुरुषांना अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages