रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचे पत्रकारांना विशेष निमंत्रण; दशकपूर्तीनिमित्त मोफत ढोल-ताशा प्रशिक्षणाची संधी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 4, 2026

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचे पत्रकारांना विशेष निमंत्रण; दशकपूर्तीनिमित्त मोफत ढोल-ताशा प्रशिक्षणाची संधी

 रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचे पत्रकारांना विशेष निमंत्रण; दशकपूर्तीनिमित्त मोफत ढोल-ताशा प्रशिक्षणाची संधी


पुणे (कटूसत्य वृत्त):- पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवातील ढोल-ताशांच्या दणदणाटात सहभागी होण्याची संधी आता शहरातील पत्रकार बांधव आणि भगिनींसाठी उपलब्ध झाली आहे. रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त पत्रकारांना मोफत सराव व पथकात सहभागी होण्याची संधी देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून ढोल-ताशा पथकांमधील सहभाग हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र विविध कारणांमुळे अनेकांना या उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टने पत्रकारांसाठी हा विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत ढोल-ताशा वादनाची आवड असलेल्या पत्रकार बांधव व भगिनींना पथकाच्या नियमित सरावात विनामूल्य सहभागी होता येणार आहे. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात येणार असून इच्छुकांना गणेशोत्सवादरम्यान पथकासोबत वादनाची संधीही उपलब्ध होणार आहे.

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचे अध्यक्ष अमर भालेराव यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, "पत्रकार हे समाजाचे सजग प्रतिनिधी आहेत. त्यांच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातही त्यांनी पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि ढोल-ताशा वादनाचा आनंद लुटावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. इच्छुक पत्रकारांनी सरावासाठी सहभागी व्हावे," असे आवाहन त्यांनी केले.

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या या अनोख्या उपक्रमाचे पत्रकारांसह गणेशोत्सवप्रेमींमध्ये स्वागत होत असून, पुण्याच्या सांस्कृतिक वारशाशी अधिकाधिक नागरिकांना जोडण्याचा हा उपक्रम ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages