विकासकामे व सामाजिक उपक्रमांनी दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

विकासकामे व सामाजिक उपक्रमांनी दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस साजरा

 विकासकामे व सामाजिक उपक्रमांनी दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस साजरा




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस सोमवारी विकासकामांचे भूमिपूजन आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेणारे धोत्रे यांनी यंदाही वैयक्तिक सत्कारापेक्षा विकासकामांना आणि सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा केला.

वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १७ मधील अनेक विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. अरविंद कांबळे यांच्या घरापासून महात्मा फुले चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम, शाळा क्रमांक ७ समोरील व्यायामशाळा, रमाईनगर येथील भुयारी गटार तसेच पाण्याच्या टाकीजवळील लक्ष्मी मंदिर परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या विकासकामांचा शुभारंभ शिवसेना नेते अनिल सावंत, नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे गटनेते नागेश भोसले यांच्या हस्ते झाला. यावेळी नागेश यादव, किरणराज घाडगे, आदित्य फत्तेपूरकर, नगरसेवक लोकेश यादव, प्रसाद कळसे, ओंकार जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

याशिवाय गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शहरातील विविध भागांतही सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. विकासकामे आणि समाजसेवेचा संगम घडवत दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages