क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना करणार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत सहभागी मंडळाचा सत्कार
क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मागील २५ वर्षांपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणूकीमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळांचे स्वागत सत्कार कार्यक्रम आयोजित करत आहे. रविवार दि. 9/8/2026 रोजी निघणाऱ्या भव्य मिरवणुकांमध्ये सोलापूर शहरातील विविध ५० साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उत्सव मंडळे सहभागी होणार आहेत. या सर्व मंडळांचा स्वागत सत्कार समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने ठेवण्यात आला आहे.क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी आयोजित केलेल्या या सत्कार समारंभ कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब,खासदार प्रणिती शिंदे, खासदार ज्योती वाघमारे, शहर मध्य चे आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, सभागृहनेते नरेंद्र काळे मध्यवर्तीचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, मध्यवर्तीअध्यक्ष साक्षात लोखंडे यांच्यासह विविध पक्षाचे आणि संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आपला
सुरेश पाटोळे
संयोजक

No comments:
Post a Comment