कोरवली येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त स्पर्धांचा उत्साह - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 8, 2026

कोरवली येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त स्पर्धांचा उत्साह

  कोरवली येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त स्पर्धांचा उत्साह





मोहोळ (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील कोरवली येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धेत अनन्या गायकवाड, आरुषी गायकवाड आणि समृद्धी दसाडे या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. सर्वच स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

स्पर्धेनंतर पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा नगीनाताई सोमनाथ कांबळे (धाराशिव) आणि प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण क्षीरसागर उपस्थित होते.

यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्षा अर्चनाताई देडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा स्वातीताई आरडे, पश्चिम महाराष्ट्र सचिव राहुल आरडे, बार्शी तालुका अध्यक्षा शारदा खुडे यांच्यासह उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले. उत्सव मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कोरवली ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, अविनाश गायकवाड, सागर गायकवाड, आर्यन गायकवाड, सोमनाथ गायकवाड, सुधीर गायकवाड, मधु गायकवाड, सहदेव ऐवळे, यश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages