मा. कुलगुरु यांच्या हस्ते आरोग्य विद्यापीठातील तलावाचे जलपूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 8, 2026

मा. कुलगुरु यांच्या हस्ते आरोग्य विद्यापीठातील तलावाचे जलपूजन

 मा. कुलगुरु यांच्या हस्ते आरोग्य विद्यापीठातील तलावाचे जलपूजन

जल सजीव सृष्टीचा जीवनाधार   -मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन



नाशिक -(कटूसत्य वृत्त):-    जल ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून संपूर्ण सजीव सृष्टीचा जीवनाधार  असल्याचे प्रतिपादन मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी विद्यापीठ परिसरातील तळयातील पाण्याचे जलपूजन करतांना केले. यावेळी, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे, डॉ. अजित फुंदे, डॉ अनिता गिते, अॅड. संदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.
      याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी सांगितले की, पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. वाढते शहरीकरण, हवामान बदल आणि भूजल पातळीतील घट या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे. विद्यापीठ हे केवळ शिक्षण देणारे केंद्र नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि कर्मचाÚयांनी पाणी बचत, पावसाचे पाणी साठवण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करून समाजात जनजागृती करावी. आजचे जलपूजन ही केवळ धार्मिक परंपरा नसून पर्यावरण रक्षणाचा आणि शाश्वत विकासाचा दृढ संकल्प आहे असे त्यांनी सांगितले.
   ते पुढे म्हणाले की, आरोग्य आणि स्वच्छता यांचा पाण्याशी अतूट संबंध आहे. सुरक्षित आणि स्वच्छ पाणी हे निरोगी समाजाचा पाया आहे. आरोग्य क्षेत्राशी संबंधित प्रत्येक विद्यार्थ्याने जलसंवर्धनाची संकल्पना आपल्या व्यावसायिक जीवनातही जोपासली पाहिजे.
      याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, जलपूजनासारखे उपक्रम आपल्या सांस्कृतिक परंपरेसोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देतात. पाण्याचा योग्य वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि जलस्रोतांचे संरक्षण ही काळाची गरज आहे. विद्यापीठ प्रशासन पर्यावरणपूरक उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देत असून जलसंवर्धनासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्याने दैनंदिन जीवनात पाणी बचतीचा संकल्प केला तर त्याचा समाजावर निश्चितच सकारात्मक परिणाम होईल असे त्यांनी सांगितले.
       यावेळी विद्यापीठातील जलसाठयाचे मा. कुलगुरु यांच्या हस्ते पूजन करुन श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, उपकुलसचिव डॉ. नितीन कावेडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, डॉ. सचिन गायकवाड, श्री. संदीप राठोड, श्री. महेश बिरारीस, श्री. संदीप महाजन, श्री. राजंेद्र शहाणे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages