नातेपुते महाविद्यालयात निर्भया पथक अकलूज अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयामध्ये नातेपुते राष्ट्रीय सेवा योजना विभाग,सांस्कृतिक विभाग, महिला तक्रार व लैंगिक छळ प्रतिबंधक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भया पथक अकलूज पोलीस उपविभाग अंतर्गत महिला सुरक्षा व महिला सक्षमीकरण,अमली पदार्थ, वाहतुकीचे नियम आणि युवा पिढीचे योगदान या अनुषंगाने ( ऐएसआय ) समाधान देशमुख यांनी महाविद्यालयातील युवक युवतींना प्रबोधन करताना कुटुंब संस्था,शिक्षणसंस्था यातून घडत असलेली समाजसंस्था विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू आजचा युवा वर्ग आहे.त्यामुळे अनिष्ट प्रवृत्तींना आळा घालून, व्यसनापासून व अमली पदार्थापासून दूर राहून , महिलांच्या सक्षमीकरणाची जबाबदारी समाज हिताच्या दृष्टिकोनातून आजच्या युवा पिढीने घ्यावी.महिला सुरक्षा व सक्षमीकरणाविषयीचे कायद्यांचे व नियमांचे पालन करून देशाचा सुजाण नागरिक घडावा. याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रम प्रसंगी पो.कॉ. भुई,महिला पो.कॉ. पिसे उपस्थित होत्या.सदर कार्यक्रम मा.प्राचार्य डॉ.भगवानराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.जगदीशचंद्र मुळीक व प्रा.उत्तम सावंत यांनी केले.कार्यक्रमासाठी प्रा.बापूराव वाघमोडे,प्रा.डॉ.सी.एम साळुंखे, प्रा.भोपळे ए.बी.,प्रा.सतीश पाटील,प्रा.हसन मोगल यांचे सहकार्य लाभले.सूत्रसंचालन प्रा.पुष्पा सस्ते यांनी केले. प्रा.राजेंद्र साठे यांनी आभार व्यक्त केले.सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी,स्वयंसेवक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment