क्रांती दिनानिमित्त महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- क्रांती दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना कामगार व समाजकल्याण कल्याण समितीच्या सभापती मा. सौ. श्रद्धा किरण पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मेकॅनिक चौक येथील तुळशीदास जाधव यांच्या पुतळ्यास, सुपर मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास, आण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक) येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास तसेच आण्णाभाऊ साठे चौक येथील डॉ. कोटणीस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
९ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या स्मृती जागविणारा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सामाजिक समता, स्वातंत्र्य आणि जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, विशाल माने, गुरुराज कानडे , किरण पवार व इतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment