छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 4, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर:

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर:

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादपंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23  लाभांचे वितरण




पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-पंढरपूर येथे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि.02 ऑगस्ट रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंढरपूरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

 

          यश पॅलेसकराड रोड पंढरपूर येथे 252 पंढरपूर विधानसभा मतदासंघातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या शिबिरास आमदार समाधान आवताडे,  प्रांताधिकारी सचिन इथापेबी.आर. माळीतहसीलदार सचिन लंगुटेमदन जाधवगटविकास  अधिकारी अमोल जाधवमुख्याधिकारी महेश रोकडेतालुका कृषी  अधिकारी सुर्यकांत मोरेतालुका आरोग्य  अधिकारी डॉ. एकनाथ बोधले तसेच  पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे पदाधिकारी व   नायब तहसिलदारमंडलाधिकरीतलाठी  आणि कर्मचारी उपस्थितीत होते.

 

           या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनासेवा व सुविधांची माहिती देण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले.

 

            यावेळी 252 पंढरपूर विधानसभा मतदासंघातील पंढरपूरमंगळवेढा तालुक्यातील नागरिकांना जिवंत सातबारा उतारे 310राज्यातील  महिलांना शेतकरी दर्जा देण्याबाबतचे प्रमाणत्र वाटप 42मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते 07राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना 37घरकुल लाभार्थ्यांच्या योजनेसाठी विशेष तरतूद 20शेतीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी फी माफ 13राज्य शासकीय योजनांचा लाभ 265,  स्थानिक स्वराज संस्थेच्या शासकीय योजनांचा लाभ 50इतर विविध योजनांचे लाभ 279 असे एकूण 1 हजार 23 लाभ देण्यात लाभांचे वितरण करण्यात आले.

 

        यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी शासनाच्या विविध योजना व उपक्रम नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे सांगितले. महसुली कामे तात्काळ मार्गी लागत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत असल्याचे सांगितले.

 

             शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणेनागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणींचे निराकरण करणे आणि महसूल विभागाच्या सेवा सुलभ व गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देणेहा या समाधान शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन योजनांची माहिती घेतली. तसेच शासकीय योजनांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व निकष याची माहिती ही नागरिकांनी घेतली.

 

      शिबिरास विविध विभागांचे अधिकारीकर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समाधान शिबिरामधून एकाच वेळी मोठ्या संख्येने पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाल्यामुळे लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.   

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages