प्रा.डॉ. बापूसाहेब आडसुळ यांची शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर मंत्री भुसे यांच्याशी चर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 12, 2026

प्रा.डॉ. बापूसाहेब आडसुळ यांची शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर मंत्री भुसे यांच्याशी चर्चा

प्रा.डॉ. बापूसाहेब आडसुळ यांची शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर मंत्री भुसे यांच्याशी चर्चा



सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात भेट घेतली. २००५ पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, प्रलंबित टप्पा अनुदानाचा प्रश्न निकाली काढावा आणि शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना सुरू करावी, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांमुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता असून, शासनाने या प्रश्नांकडे सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून पाहण्याची मागणी यावेळी करण्यात आली.२००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अंशतः अनुदानित शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, टप्पा अनुदानाचा प्रलंबित विषय तातडीने मार्गी लागावा, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस आरोग्य उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यावर शिष्टमंडळाने विशेष भर दिला. अंशतः अनुदानित शिक्षकांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवरही तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ यांनी संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. शिक्षकांना त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवू नये आणि प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी शिक्षकांच्या मागण्यांचा शासनस्तरावर सकारात्मक विचार करून प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाच्या पुढील भूमिकेकडे आता शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

या भेटीवेळी राज्य सल्लागार दत्तात्रय काशीद, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख रतिलाल डोंगरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष वैभव शेटे, जिल्हा सचिव उमेश कल्याणी, सोलापूर शहराध्यक्ष जुबेर हिप्परगी, आप्पासाहेब पाटील, सुरज जमा आदी पदाधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages