नाशवंत गोष्टींकडे दुर्लक्ष करून शाश्वत मूल्ये जपा; युवकांनी समाजकारण व
नाशवंत गोष्टींकडे दुर्लक्ष करून शाश्वत मूल्ये जपा; युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनसेवा करावी – माजी आमदार जयवंतराव जगताप
करमाळा (कटूसत्य वृत्त):- "जो दौडेगा वो मंजील पाएगा" असे म्हणत आजच्या युवकांनी नाशवंत गोष्टींकडे दुर्लक्ष करून शाश्वत मूल्ये जपावीत तसेच समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून जनतेची निःस्वार्थ सेवा करावी, असे प्रतिपादन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.
मुख्यमंत्री बळीराजा पाणंद (शेतरस्ता) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीवर करमाळा विधानसभा सह-अध्यक्षपदी दिग्विजय बागल यांची निवड तसेच भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल जगताप परिवाराच्या वतीने आयोजित घरगुती सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी जयवंतराव जगताप म्हणाले की, आजचा काळ बदलला आहे. जो सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जातो, त्यांच्या अडीअडचणी सोडवतो, त्यालाच जनता नेता म्हणून स्वीकारते. वारशाने जनमानसात स्थान मिळविण्यापेक्षा संघर्ष, कष्ट आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी करावा. आजच्या युवकांकडून राष्ट्रहित आणि समाजहिताच्या मोठ्या अपेक्षा असून ज्येष्ठांनीही कर्तृत्ववान युवकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना वडीलकीच्या नात्याने मार्गदर्शन करावे.
यावेळी त्यांनी देशभक्त कै. नामदेवराव जगताप, स्व. आण्णासाहेब जगताप यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच माजी राज्यमंत्री स्व. दिगंबर (मामा) बागल यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांना उजाळा देत १९८९ पासूनच्या आपल्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतील विविध आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या. दोन्ही सत्कारमूर्तींना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांनी आपल्या राजकीय अनुभवातील अनेक प्रसंग आणि किस्से सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमोदशेठ संचेती, ज्येष्ठ समाजसेवक श्रेणीकशेठ खाटेर, माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, गटसचिव बबन मेहेर, बाजार समिती संचालक जनार्दन नलवडे, बाजार समिती सचिव विठ्ठल क्षीरसागर, उद्योजक संतोषशेठ गुगळे, माजी नगरसेवक सुरेश इंदूरे, जगदीश आगरवाल, सुहास घोलप, संजय घोरपडे, बाजार समिती संचालक मनोज पितळे, विक्रांत मंडलेचा, कॉन्ट्रॅक्टर भारत थिटे, अनिल सुरवसे, दत्तात्रय शिर्के, नितीन दळवे, लक्ष्मण थोरात, जोतीराम ढाणे, नगरसेवक युवराज चिवटे, नगरसेवक रोहीदास आलाट, नगरसेवक सचिन अब्दूले, विजय सरडे, प्राचार्य डॉ. तानाजी जाधव, मुख्याध्यापक अनिस बागवान, मुख्याध्यापक युसूफ शेख, बाजार समिती सहसचिव रवींद्र उकीरडे, शेखर जोगळेकर, मंगेश तरकसे, महेश ढाणे, दिगंबर रासकर, खरेदी-विक्री संघ संचालक हनुमंत ढेरे, शहाजी शिंगटे, बाजार समितीचे नूतन संचालक हनुमंत चांदणे, मयूर दोशी, उत्कर्ष गांधी, सुनील मेहता, अमृतशेठ कटारिया, अस्लम शेख, सादिक आतार, रविंद्र सपकाळ, चेतन आलाट आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. दत्तात्रय भागडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, श्रेणीकशेठ खाटेर, संजय घोरपडे आणि बबन मेहेर यांनी मनोगते व्यक्त केली. सत्कारमूर्ती दिग्विजय बागल व गणेश चिवटे यांनी आपल्या भावना व्यक्त करत जगताप परिवाराने केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य डॉ. तानाजी जाधव यांनी मानले.
.png)
No comments:
Post a Comment