श्री विठ्ठल कारखान्यावर रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर संपन्न
रक्तदान शिबीर - श्री विठ्ठल सह. साखर कारखाना, स्वामी समर्थ ब्लड बँक पंढरपूर, पंढरपूर ब्लड बँक पंढरपूर व बजाज रक्तपेढी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रक्तदान शिबीराचे उद्घाटन डॉ. मदनजी क्षिरसागर, डॉ. ऋतुजा येडगे मॅडम यांचे शुभहस्ते व कारखान्याचे संचालक व कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांचे उपस्थितीत करण्यात आले. सदर प्रसंगी 141 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
नेत्ररोग तपासणी, उपचार व मोफत चष्मे वाटप शिबीर - श्री विठ्ठल सह. साखर कारखाना व विठाई मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल पंढरपूर, मंगलज्योती नेत्रालय पंढरपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे, उपकेंद्र गुरसाळे यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे शिबीर यशस्वी होणेसाठी डॉ. ऋतुजा येडगे नेत्रचिकीत्सक, डॉ. सचिन गुटाळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गुरसाळे सर्व स्टाफ व आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले. या शिबीरामध्ये 277 रुग्णांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक करताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात त्यामध्ये दि.०१.०८.२०२६ रोजी श्री विठ्ठल प्राथमिक शाळा, वेणूनगर येथील बालवाडी ते ४ थी पर्यंतच्या विदयार्थ्यांना खाऊ, गणवेश व शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण व श्री नागन्नाथ मुकबधीर विद्यालय बाभुळगांव येथील विद्यार्थ्यांना स्नेह भोजन असे कार्यक्रम घेणेत आले असून दि.०३.०८.२०२६ रोजी रक्तदान, नेत्ररोग तपासणी, उपचार व मोफत चष्मे वाटप शिबीर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी डॉ. मदनजी क्षिरसागर बोलताना म्हणाले की, रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे, आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित करुन एक उत्कृष्ठ उपक्रम आपण राबवित आहात. आमदार अभिजीत आबांना अशीच आपली सेवा करणेसाठी त्यांना बळ मिळून त्यांना दिर्घाआयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.
संचालक तुकाराम मस्के म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यामध्ये प्रत्येक वर्षी विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. पंढरपूर तालुक्यामध्ये ५ वर्षामध्ये १ लाख वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. तसेच कारखाना कार्यस्थळावर १०,००० वृक्षांची लागवड केली आहे. कर्मचाऱ्यांचे आरोग्यही महत्वाचे असल्याने त्यांच्याही वैद्यकीय तपासणी केल्या जातात. आमदार अभिजीत आबांचे जीवन सर्वसामान्य माणसांसाठी समर्पित व्हावे, असे बोलून त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सदर प्रसंगी डॉ.गुटाळ म्हणाले की, श्री विठ्ठल सह. साखर कारखाना व विठाई मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल पंढरपूर, मंगलजोती नेत्रालय पंढरपूर व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गुरसाळे यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान, नेत्ररोग तपासणी, उपचार व मोफत चष्मे वाटप शिबीर कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, तसेच कारखान्याचे सर्व कामगारांना हेल्थकार्ड देणेत येणार आहेत, असे त्यांनी सांगीतले.
सुत्र संचालन आर्वे यांनी केले तर आभार नागटिळक यांनी मानले.
सदर कार्यक्रमास स्वामी समर्थ ब्लड बँक पंढरपूरचे किरण कदम, पंढरपूर ब्लड बँक पंढरपूर संतोष उपाध्ये व बजाज रक्तपेढी पंढरपूर किरण घोंगडे, कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, धनंजय काळे, कालिदास साळुंखे, नवनाथ नाईकनवरे, सिध्देश्वर बंडगर, महेश खटके, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, ठेकेदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment