'रॅपिडो'वर आरटीओ अन् वाहतूक पोलिसांची कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 14, 2026

'रॅपिडो'वर आरटीओ अन् वाहतूक पोलिसांची कारवाई

 'रॅपिडो'वर आरटीओ अन् वाहतूक पोलिसांची कारवाई

११ दुचाकींवर १० हजारांहून अधिक दंड!



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत एसटी स्थानक परिसरातून 'रॅपिडो' ॲपद्वारे अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या ११ दुचाकींवर कारवाई केली आहे. या कारवाईत एका वाहनाला १० हजार रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारचे आवश्यक नियम आणि अटी पूर्ण न केल्यामुळे राज्यात रॅपिडो सेवा अवैध मानली जाते. तरीही अनेक तरुण या ॲपवर आपल्या दुचाकी नोंदवून प्रवासी वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे.
इतर राज्यांत परवानगी, महाराष्ट्रात अवैध!
आर.टी.ओ. कडून मिळालेल्या माहितीनुसार, 'रॅपिडो' सेवा इतर काही राज्यांमध्ये अधिकृत असली, तरी महाराष्ट्रात या सेवेला अद्याप परवानगी दिलेली नाही. रॅपिडो कंपनीने महाराष्ट्र शासनाच्या वाहतूक नियमावलीतील अटी व शर्तींची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात या ॲपद्वारे दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
तरुणांनी रॅपिडोवर नोंदणी करू नये: पोलीस निरीक्षक विजय खोमणे
"रॅपिडो ॲपवरून बाईकद्वारे प्रवासी वाहतूक करणे बेकायदेशीर आहे. तरुणांनी आर्थिक फायद्यासाठी या ॲपवर आपल्या गाड्या रजिस्टर करू नयेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. आरटीओ व वाहतूक शाखेतर्फे सर्व दुचाकीधारकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे."
— विजय खोमणे (पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, सोलापूर)
नागरिक आणि दुचाकीधारकांसाठी महत्त्वाचे
दंडात्मक कारवाई: नियमबाह्य प्रवासी वाहतूक करताना आढळल्यास १० हजार रुपये किंवा त्याहून अधिक दंडाची तरतूद आहे.
सुरक्षिततेचा प्रश्न: अनधिकृत वाहतुकीमुळे अपघाताच्या वेळी विम्यासंदर्भात मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
कारवाई सुरूच राहणार: एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन व गर्दीच्या ठिकाणी अशी दंडात्मक कारवाई पुढेही तीव्र केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages