मॉडेल विविधांगी प्रशालेत शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 14, 2026

मॉडेल विविधांगी प्रशालेत शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

 मॉडेल विविधांगी प्रशालेत शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

   


अकलूज (कटूसत्य वृत्त):- दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर मधील इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र गुणवंत विद्यार्थी स्वराज सावंत,प्रणव देवकर व सरताज  मुलाणी यांचा दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मोहन लांडे यांचे हस्ते पुष्पहार  व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी संस्थेच्या  नूतन चेअरमनपदी मोहन लांडे यांची निवड झाल्याबद्दल प्रशालेचे कर्मचाऱ्यांचे वतीने त्यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
   विद्यार्थी स्वराज अमित सावंत याने शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २७८  गुण मिळवून जिल्हा ग्रामीण कोट्यातून राज्यात दुसरा क्रमांक मिळविला तर प्रणव प्रशांत देवकर ३०० पैकी २५८ गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात  २७ वा आणि सरताज सलीम मुलाणी ३०० पैकी २५२ गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात ५० वा क्रमांक मिळविला. अध्यक्षपदावरून बोलताना चेअरमन मोहन लांडे यांनी वर्षभरामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखविणाऱ्या दोन विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रति एक हजार रुपये पारितोषिक देण्याचे जाहीर केले व यावेळी विद्यार्थ्यांनी त्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
    कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्राचार्य कल्लप्पा बिराजदार, उपप्राचार्य रितेश पांढरे, पर्यवेक्षक सुनील जवरे,पालक अमित सावंत, वर्षा सावंत, आशा सावंत,प्रेमा देवकर, प्रशांत देवकर, जस्मिन मुलाणी आपल्या  मुलांच्या कौतुकासाठी व्यासपीठावर उपस्थित होते.
        पात्र विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक नवनाथ गायकवाड,सचिन आतकर, वैशाली बनकर, मेघा जोशी, अभिजीत हेगडे, सुखधा विधाते,आशा रानमाळ, सुवर्णा पोळ, मनीषा नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी त्यांचा व पालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते गुलाब  पुष्प देऊन करण्यात आला
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ गायकवाड यांनी केले तर आभार रितेश पांढरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages