विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याच्या अनुषंगाने स्पर्धा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि कलात्मक दृष्टी विकसित व्हावी, या उद्देशाने संभाजी आरमार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला सोलापूर शहरातील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांचा उत्स्फर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने हे
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संभाजी आरमार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे, नगरसेवक सात्विक बडवे, नितीन खिलारे, यशवंत बिराजदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित संघटनेचे पदाधिकारी शशिकांत शिंदे, गजानन जमदाडे, सागर ढगे, राज जगताप, सागर दासी, महिला आरमार
संघटनेच्या जिल्हाप्रमुख संध्या हेब्बाळकर, अॅड. गीता पवार, ढगे, प्रदीप मोरे तेजस चौधरी, सुधाकर करणकोट, प्रवीण मोरे, सचिन लंगाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवक्ते श्रीकांत कदम यांनी केले. प्रास्ताविक अजिंक्य पाटील यांनी केले तर आभार जिल्हा संघटक युवराज चव्हाण यांनी मांडले.
No comments:
Post a Comment