पोखरापूर येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

पोखरापूर येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

 पोखरापूर येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पोखरापूर ते धनाजी विठोबा मंदिर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ




पोखरापूर (कटूसत्य वृत्त) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत मोहोळ तालुक्यातील पोखरापूर ते धनाजी विठोबा मंदिर या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.


महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य बालाजी नरुटे यांनी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधीची मागणी केली होती. परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन ग्रामविकास व पंचायतराजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. सुमारे ५० लाख रुपये खर्चाच्या या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.


या रस्त्यामुळे पोखरापूर परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.


यावेळी जिल्हा परिषद सदस्य बालाजी नरुटे, सरपंच सानिका नरुटे, सुशील क्षीरसागर, शाहीर उन्हाळे, अनिल कदम, हर्षद दळवी, दत्तात्रेय काकडे, राजकुमार दळवे, रविराज वाघमारे, रियाज शेख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages