सोलापूरात सायबर जनजागृती; २७० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

सोलापूरात सायबर जनजागृती; २७० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 सोलापूरात सायबर जनजागृती; २७० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाच्या Student Police Cadet (SPC) कार्यक्रमांतर्गत मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने दोन शाळांमध्ये सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत सो. म. पा. प्रशाला क्र. १, कॅम्प आणि आंध्र भद्रावती माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार, त्यांचे दुष्परिणाम तसेच ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया गैरवापर आणि सायबर गुन्हेगारांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस शिपाई अंबलगी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेचे महत्त्व, सुरक्षित इंटरनेट वापर आणि कोणत्याही संशयास्पद ऑनलाइन व्यवहाराची त्वरित तक्रार करण्याबाबत माहिती दिली.
या जनजागृती कार्यक्रमास सो. म. पा. प्रशाला क्र. १ येथील १२० तसेच आंध्र भद्रावती माध्यमिक विद्यालय येथील १५० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. अशा प्रकारे एकूण २७० विद्यार्थ्यांनी या सायबर जनजागृती उपक्रमाचा लाभ घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages