सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे टोल नाका येथे भरधाव शिवशाही बसचे ब्रेक फेल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 5, 2026

सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे टोल नाका येथे भरधाव शिवशाही बसचे ब्रेक फेल

 सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे टोल नाका येथे भरधाव शिवशाही बसचे ब्रेक फेल


सोलापूर (कटूसत्य वृत्त) :  ४ ऑगस्ट २०२६ रोजी  सायंकाळी  सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर  वरवडे टोल नाका येथे  सोलापूर वरून  पुणे येथे भरधाव वेगाने जात असलेल्या एका शिवशाही बस क्रमांक MH 06 BW 3522 चे ब्रेक फेल झाल्याने शिवशाही बस चालक  शिवशरण भोगेश्वर म्हेत्रे वय ५६ वर्षे,( रा. अक्कलकोट)  यांनी प्रसंगावधान दाखवून शिवशाही बस वरवडे टोल नाका येथील मोकळ्या जागेत  विटा टाकलेल्या ठिकाणी घेऊन गेले असून या  बसने रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका महावितरणच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने सदर लाईटचा खांब उन्मळून पडून  सदर लाईटच्या खांबावरील तारा ह्या बसवर पडल्या असून सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसून शिवशाही बस मध्ये असलेल्या १४ प्रवाश्यांना  वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथक आणि रुग्णवाहिका पथकाने बसमधून सुखरूप बाहेर काढले असून या शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना दुसऱ्या एसटी बस मध्ये बसवून दिले असून  या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका पथक डॉ महेंद्र ताकतोडे रुग्णवाहिका चालक  बंडू गायकवाड ग्रस्तीपथक विजय साळुंके अभिजीत गुजरे, नवनाथ मोरे, हे  तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताची माहिती मिळताच मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे कर्मचारी  हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस ठाणे येथील अपघात विभागाचे अधिकारी सरडे यांना वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथक प्रमुख विजय साळुंके यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages