इंद्रभवन परिसरात आज महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 15, 2026

इंद्रभवन परिसरात आज महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 इंद्रभवन परिसरात आज महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.




सोलापूर  (कटूसत्य वृत्त) : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात आज महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सभागृहनेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई जंगम कामगार कल्याण व जनसंपर्क  सभापती श्रद्धा पवार महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, मुख्यालेखाधिकारी रत्नराज जवळगेकर  उपायुक्त सोनाली यादव यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ  शपथ घेतली. निरोगी समाज निर्माण करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा तसेच पाण्याचे संवर्धन करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.


तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा, कार्यक्षमता आणि उल्लेखनीय योगदानाबद्दलसोलापूर : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात आज महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सभागृहनेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई जंगम, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे मंडई व उद्यान सभापती राजशेखर पाटील कामगार कल्याण व जनसंपर्क  सभापती श्रद्धा पवार स्थापत्य समितीचे सभापती विजय चिप्पा, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, गटनेते अमोल बापू शिंदे नगरसेविका श्रीदेवी फुलारे नगरसेविका संगीता जाधव नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक नय्युम सालार नगरसेविका संगीता जाधव नगरसेविका वंदना गायकवाड, अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, मुख्यालेखाधिकारी रत्नराज जवळगेकर  उपायुक्त सोनाली यादव यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ  शपथ घेतली. निरोगी समाज निर्माण करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा तसेच पाण्याचे संवर्धन करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.


तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा, कार्यक्षमता आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी सर्व सोलापूरकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी सर्व सोलापूरकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी केली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages