मनोरमा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा १५ ऑगस्टला
पालकमंत्र्यांच्या हस्ते आ. राऊत यांचा होणार सत्कार
या सभेत विधान परिषदेवर नुकतेच निवडून आलेले आमदार राजेंद्र राऊत यांचा मनोरमा परिवाराच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या वेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी आमदार दिलीप माने, भाजपचे प्रदेश सदस्य विक्रम देशमुख,बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट संतोष पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बँकेचा मिश्र व्यवसाय १,०६६ कोटींवर
मनोरमा को-ऑप. बँकेची स्थापना ९ मे १९९७ रोजी संस्थापक चेअरमन कै. सदाशिवराव मोरे यांनी केली. गेल्या २९ वर्षांच्या वाटचालीत बँकेने मुख्य कार्यालयासह एकूण ११ शाखांचा विस्तार केला असून, नुकतीच अंत्रोळीकर नगर, सोलापूर येथे नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे.
३१ मार्च २०२६ अखेर बँकेचा मिश्र व्यवसाय १,०६६.६७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेच्या ठेवी ६३४.४४ कोटी रुपये, कर्जे ४३२.२३ कोटी रुपये, गुंतवणूक २०७.२० कोटी रुपये असून वसूल भागभांडवल १७.१५ कोटी रुपये आहे. राखीव व इतर निधी १८.४५ कोटी रुपये असून आर्थिक वर्षअखेर बँकेला आयकरासह ५.२० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बँकेचा लेखापरीक्षण वर्ग 'अ' आहे .
विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षांपासून बँकेचा एनपीए शून्य टक्के असल्याचे बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी सांगितले
चौकट......
तीन वेळा मिळाला आदर्श बँक पुरस्कार
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनकडून मनोरमा को-ऑप. बँकेला आतापर्यंत तीन वेळा 'आदर्श बँक पुरस्कार' मिळाला आहे.
महिला, शेतकरी आणि लघुउद्योगांना अर्थसहाय्य
मनोरमा बँक परिवाराने सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात सातत्याने योगदान दिले आहे. महिला लघुउद्योग, महिला बचत गट, ग्रामीण शेतकरी, दुग्ध व्यवसाय तसेच कुटीर उद्योगांना अर्थसहाय्य देत बँकेने सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे बँकेने म्हटले आहे.
बँकेचे कार्यक्षेत्र सोलापूर, पुणे, धाराशिव आणि सांगली जिल्ह्यांपर्यंत असून, सोलापूर शहर व जिल्ह्याच्या आर्थिक विकासात बँकेचे योगदान राहिले आहे. बँक २९ वर्षे पूर्ण करून ३० व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
चौकट....
किरण माने यांना जीवनगौरव पुरस्कार
मनोरमा साहित्य मंडळी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पश्चिम सोलापूर यांच्या वतीने अभिनेते किरण माने यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि स्मरणिका असे आहे.
No comments:
Post a Comment