कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक कामामुळे मोहोळ नागरीची भरभराट- राजन पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक कामामुळे मोहोळ नागरीची भरभराट- राजन पाटील

 कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक कामामुळे मोहोळ नागरीची भरभराट- राजन पाटील

मोहोळ नागरी पतसंस्थेच्या ठेवी २१० कोटींच्या पार



मोहोळ (कटूसत्य वृत्त): मोहोळ नागरी पतपुरवठा पतसंस्थेत कर्मचाऱ्यानी प्रामाणिक पणे संस्थेचे व सभासदाचे हित लक्षात घेऊन काम केल्याने संस्थेची प्रगती झाली आहे. आज ठेवी २०० कोटींच्या पुढे गेल्या आहेत. तर निव्वळ नफा ५ कोटी ०७ लाख इतका झाला आहे. मोहोळ नागरी पतपुरवठा संस्थेने व्यावसायिक म्हणून काम न करता सभासदांचे हीत जोपासण्याचे काम केले आहे. असे सांगत अनेक पतसंस्था व अन्य संस्था बंद पाडण्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो, परंतु त्याचा ठपका चेअरमन व संचालक मंडळावर येतो. परंतु मोहोळ नागरी च्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोहोळ नागरी पतपुरवठा संस्था आपला विस्तार नक्कीच वाढवेल असा आशावाद सहकार राज्य परिषदेचे अध्यक्ष ना. राजन पाटील यांनी केले.
मोहोळ नागरी सहकारी पतपुरवठा संस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानावरून संस्थेचे चेअरमन डॉ. कौशिक गायकवाड म्हणाले की, या पतसंस्थेत इतर बँका पेक्षा कमी व्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे सभासदांना कर्ज फेडणे सोयीचे होते. मोहोळ नागरी पतपुरवठा संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी हे सभासदांच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात त्यामुळे सभासदांनी व इतर नागरिकांनी मोहोळ नागरी मोहोळ नागरी सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, मोहोळ स्त्री वार्षिक सर्वसारण समा मध्ये विश्र्वासाने ठेवी ठेवाव्या त्याचे प्रामाणिकपणे जतन आम्ही करू असे डॉ. कौशिक गायकवाड म्हणाले. या प्रसंगी शंभर टक्के कर्ज वसुली केलेल्या शाखा प्रमुखांचा सन्मान महाराष्ट्र राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या
उपस्थितीत चेअरमन डॉ. कौशिक गायकवाड, व्हॉईस चेअरमन प्रमोद डोके संचालक सतीश भोसले, शहाजी गुंड, चंद्रकांत वाघमोडे आदी संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक मुस्ताक शेख यांनी केले. तर आभार पतसंस्थेची व्हाईस चेअरमन प्रमोद डोके यांनी व्यक्त केले. यावेळी संचालक जगन्नाथ कोल्हाळ, नारायण गुंड, सतीश भोसले, शहाजी गुंड, दिलीप पाटील, बाजीराव जोशी, चंद्रकांत वाघमोडे, रमेश देशमाने, तानाजी रोहीटे, किर्ती देशपांडे, रंभादेवी गुंड यांच्यासह ज्येष्ठ सभासद खाजाभाई शेख, मोहन होनमाने, राकेश देशमाने, सलीम हरणमारे, राजाराम वाघमारे, नागेश भोसले, आदींसह सभासद शाखा प्रमुख त्यांचे सहकारी उपस्थित होते.

चौकट
नफा ५ कोटी ०७ लाख, १५ टक्के प्रमाणे सभासदांना लाभांश जाहीर

संस्थेच्या ठेवी २१०. ७३ कोटी असुन कर्जवाटप १३१.३१ कोटी आहे. चालु वर्षी संस्थेस ५ कोटी ०७ लाख इतका नफा झालेला आहे. खेळते भांडवल २९३.५७ कोटी असुन संस्थेचे गंगाजळी व इतर निधी ६२.८० कोटी आहेत.संस्थेने चालु वर्षी १५ टक्के प्रमाणे सभासदांना लाभांश वाटप जाहिर केले आहे. एनपीओ 00.00 टक्के आहे. कर्जाची वसुली ९९.९० टक्के आहे. संस्थेस ऑडीट वर्ग अ मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages