सोलापूरकरांनो, आजपासून आसरा चौकातून जुळे सोलापूरकडे जाणारा रस्ता बंद!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील महिला हॉस्पिटल ते हॉटेल बालाजी सरोवर या अंतरावरील रस्त्याचे मजबुतीकरण सुरू आहे. सध्या हॉटेल बालाजी सरोवरपासून काम सुरू करण्यात आले आहे. आज (शुक्रवारी) आसरा चौकात काम केले जाणार आहे.
त्यामुळे आसरा चौकातून जुळे सोलापूरकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते जेऊर या अंतरावरील रस्त्याचे मजबुतीकरण सुरू आहे. सध्या हॉटेल बालाजी सरोवर ते महिला हॉस्पिटलपर्यंत काम सुरू आहे. त्यामुळे आसरा चौकाकडे जुळे सोलापूर व नई जिंदगीकडून येणाऱ्या वाहतुकीमुळे आसरा चौकात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यासाठी आसरा चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी आदेश काढून आसरा रेल्वे ब्रिज ते आसरा चौक हा रस्ता गुरुवारी (ता. २) रात्री बारा वाजल्यापासून काम संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. आदेशाचा भंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

No comments:
Post a Comment