व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

 व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला माजी विद्यार्थी मेळावा 2026 उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.पी.पी. कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख यांनी प्रस्तावनेत उपस्थितांचे स्वागत करून यावर्षी झालेल्या उत्कृष्ट प्लेसमेंट बद्दल माहिती दिली. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. अविनाश पाटील यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या विकासाचा आढावा सादर केला. डॉ. ए. एस. विभुते, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे विभाग प्रमुख यांनी महाविद्यालयाने गुगल स्किल, रेड हॅट यांसारख्या जागतिक कंपन्यांशी भागीदारी केली असून, या माध्यमातून उपलब्ध होणारे विविध कौशल्यविकास अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. गायकवाड यांनी माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देत महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण कमी खर्चात उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच महाविद्यालयातील विविध शैक्षणिक सुविधा, आठ पीएच.डी. पदवीधारक प्राध्यापक आणि एकोणीस पीएच.डी. संशोधन करणारे प्राध्यापक कार्यरत असल्याची माहिती दिली. तसेच प्रकल्प आधारित शिक्षण, संशोधनास चालना आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात सुरू केलेले स्टार्ट अप्स  इत्यादीचा आढावा घेतला.
संस्थेचे व्हाईस चेअरमन एम. एल. कटकधोंड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार मानून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी विद्यार्थी सोमय्या अवधूत यांनी कठोर परिश्रम, शिस्त आणि योग्य दिशा यामुळेच यश मिळाल्याचे सांगितले. संतोष उमरगे यांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत करिअरमधील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच साबीर नाईकवाडी आणि स्वराली यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व शिक्षण घेत असताना मिळालेल्या सोयी सुविधा तसेच संधी याबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. जी. के. देशमुख यांनी विद्यार्थी हे महाविद्यालयाचे आजीवन सभासद असून, शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन त्यांचे करिअर घडविण्याचे कार्य करतात, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अमोल (नाना) चव्हाण उपस्थित होते. तसेच कॉम्प्युटर डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख डॉ. प्रीती देशमुख, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख डॉ. एस.एस. स्वामी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे विभाग प्रमुख डॉ. एस.डी. डोंगरे, बी.सी.ए.चे विभाग प्रमुख डॉ. एस. आर. आळंद, प्रथम वर्ष विभाग प्रमुख जे. के. रोमन तर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संतोष माने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भवानी मॅडम यांनी केले, तर प्रा. सय्यद यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages