महाज्योती आणि वनार्टीतील कोट्यवधींच्या निविदांची चौकशी करा-रोहन सुरवसे-पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

महाज्योती आणि वनार्टीतील कोट्यवधींच्या निविदांची चौकशी करा-रोहन सुरवसे-पाटील

 महाज्योती आणि वनार्टीतील कोट्यवधींच्या निविदांची चौकशी करा-रोहन सुरवसे-पाटील




पुणे (कटूसत्य वृत्त):- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) तसेच वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) येथील कथित आर्थिक गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेते रोहन सुरवसे पाटील यांनी महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात महाज्योतीचे वित्त व लेखा अधिकारी तथा वनार्टीचे प्रभारी संचालक प्रशांत वावगे आणि महाज्योतीचे निविदा सल्लागार चंदनसिंग यांच्या कार्यकाळात कोट्यवधींच्या निविदांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र महाज्योती उच्चस्तरीय समिती किंवा सक्षम तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, प्रशांत वावगे हे महाज्योतीमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांच्या बदलीनंतर प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात कोट्यवधींच्या निविदा मंजूर झाल्याचा उल्लेख
करण्यात आला आहे. या सर्व निविदांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
         सुरवसे पाटील यांनी प्रशांत वावगे यांना महाज्योती व वनार्टीतील सर्व पदांवरून तात्काळ दूर करणे, चंदनसिंग यांची निविदा सल्लागार म्हणून नियुक्ती रद्द करणे, त्यांच्या कार्यकाळातील निविदांची चौकशी करणे, दोषी आढळल्यास फौजदारी व विभागीय कारवाई करणे, शासनाच्या आर्थिक हिताचे संरक्षण सर्व करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे तसेच चंदनसिंग यांच्याशी संबंधित संस्थांना काळ्या यादीत टाकून सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेतून वगळण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages